Village 10 Business: ग्रामीण भागात आजही अनेक बेरोजगार तरुण आहेत जे काहीतरी व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची स्वप्न पाहत आहेत. मात्र सध्याच्या घडीला ग्रामीण भागात कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येतील आणि हमखास नफा देतील असे अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत. या लेखात आपण अशाच 10 व्यवसायीक कल्पनाची माहिती पाहणार आहोत, ज्या कि कमी भांडवल, सरळ प्रक्रिया आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या असणार आहेत.Village 10 Business
1. शेळीपालन व्यवसाय
शेतीला पूरक आणि कमी खर्चिक व्यवसाय म्हणजे शेळीपालन. सुरुवातीला ३ ते ५ शेळ्यांपासून व्यवसाय सुरू करता येतो.
लाभ
- शेळीचे दूध आरोग्यदायी आणि मागणी असलेले
- बोकडाच्या मांसाला बाजारात चांगली किंमत
- शेळीच्या खतामुळे शेतीत सुधारणा
शासकीय अनुदान
पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून १० शेळ्या व १ बोकडासाठी अनुदान दिलं जातं.
2. दूध संकलन केंद्र / डेअरी
गावातील दूध उत्पादकांकडून दूध संकलन करून डेअरी उत्पादनांमध्ये रूपांतर करणे.
लाभ
- कमी गुंतवणूक
- रोजच्या उत्पन्नाची संधी
- शासन अनुदानाची मदत
3. कृषी सेवा केंद्र
शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करण्याचे दुकान.
लाभ
- शेतकऱ्यांशी थेट संबंध
- दर वर्षी सातत्यपूर्ण मागणी
- कंपन्यांकडून बोनस व परदेशी सहलीची शक्यता
4. ट्रॅक्टर भाडे व्यवसाय
शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व्यवसाय. स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन इतर शेतकऱ्यांना भाड्याने सेवा द्यावी.
शासकीय मदत
- महाडीबीटी पोर्टलवरून ट्रॅक्टरसाठी अनुदान
- बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान ₹३.१५ लाखांपर्यंत
5. पिठाची गिरणी / चक्की
गावातच दळणाची गिरणी सुरू करून रोज उत्पन्न मिळवता येते.
लाभ
- ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दर
- चिरस्थायी व्यवसाय
- आरोग्यदायी दळणासाठी चांगली मागणी
6. सीएससी / ऑनलाईन सेवा केंद्र
गावकऱ्यांना शासकीय सेवा मिळवून देण्याचे केंद्र सुरू करणे.
सेवा प्रकार
- आधार कार्ड
- शासकीय योजना अर्ज
- रेशन कार्ड, प्रमाणपत्र, झेरॉक्स
गुंतवणूक - कॉम्प्युटर, प्रिंटर, इंटरनेट – ₹५०,००० ते ₹१.५ लाख
7. टायर पंक्चर व ट्युब दुकान
गावात वाढत्या वाहनसंख्येमुळे हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे.
लाभ
- कमी गुंतवणूक
- ट्युब विक्रीतून अतिरिक्त कमाई
- टपरी जोडून किरकोळ विक्रीची संधी
8. किराणा व जनरल दुकान
दैनंदिन गरजांच्या वस्तू विकून सतत उत्पन्न मिळवता येते.
सुरुवात
- सुरुवातीला थोडीशी गुंतवणूक
- परवाना काढणे आवश्यक
- ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा
9. टेलरिंग / शिवणकाम व्यवसाय
शिलाई मशीनद्वारे महिला व पुरुषांचे कपडे शिवण्याचा व्यवसाय.
लाभ
- शासकीय शिलाई मशीन अनुदान
- प्रशिक्षणानंतर काम सुरू
- सणासुदीच्या काळात जास्त कमाई
10. पशुखाद्य विक्री दुकान
दुधाळ जनावरांसाठी खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय.
लाभ
- शेळी, गाय, म्हैस पाळणाऱ्यांकडून सातत्याने मागणी
- गावाबाहेरही वितरण करता येते
- थोड्या जागेत व्यवसाय सुरू करता येतो
निष्कर्ष
वरील सर्व व्यवसाय कमी गुंतवणुकीत आणि कमी जोखमीत सुरू करता येतात. योग्य योजना, स्थानिक गरजा आणि ग्राहक समजून घेतल्यास प्रत्येक व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.