PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 18 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
20 वा हप्ता जुलैमध्येच?
PM किसानचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी दिला जातो. मागील पीएम किसान चा 19 वा हप्ता फेब्रुवारी मध्ये वितरित झाला होता. त्यामुळे आता 20 व्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, एप्रिल ते जुलै या कालावधीत येणारा हप्ता यावेळी उशिरा येत आहे. 31 जुलैपर्यंत 20 वा हप्ता खात्यात येण्याची शक्यता वाटत आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत काय मिळते?
केंद्र सरकार PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये निधी पाठवत आहे.
- वर्षभरात 6000 रुपये मदत
- ही रक्कम 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते.
- 1 एप्रिल ते 31 जुलै – पहिला हप्ता
- 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर – दुसरा हप्ता
- 1 डिसेंबर ते 31 मार्च – तिसरा हप्ता
लाभ घेण्यासाठी अटी काय?
ही रक्कम केवळ पात्र शेतकऱ्यांनाच दिली जाते. खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे:
- शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक
- ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक
- जमीन पडताळणी पूर्ण असणे
- आधार आणि बँक खाते लिंक असणे
ज्यांना 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळते किंवा डॉक्टर, इंजिनिअर, करदाते इ. व्यक्तींना योजनेपासून वगळले आहे.
आतापर्यंत या योजनेमार्फत 11 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना 3.64 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.
नमो शेतकरी योजना देखील महत्त्वाची
महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PM किसान आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा एकूण 12000 रुपयांचा लाभ मिळतो.
निष्कर्ष
PM किसान योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्येच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप नाही. मात्र, पंतप्रधानांचा बिहार दौरा आणि पूर्वीचा ट्रेंड पाहता 18 ते 31 जुलैदरम्यान हप्ता जाहीर होऊ शकतो. पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.