---Advertisement---

MahaDBT Farmer Scheme List महाडीबीटी लॉटरीची नवीन यादी आली, येथे डाउनलोड करा

Published On: June 22, 2025
Follow Us
MahaDBT Farmer Scheme List
---Advertisement---

MahaDBT Farmer Scheme List महाराष्ट्र सरकारमार्फत विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. अशाच एक महत्त्वाची योजना म्हणजे MahaDBT Farmer Scheme. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्रीसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर आवश्यक ते यंत्र किंवा सुविधा निवडून अर्ज करायचा असतो. अर्ज स्वीकारल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि MahaDBT Farmer Scheme List प्रसिद्ध केली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळतो.

या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

या योजनेच्या माध्यमातून खालील गोष्टींवर सबसिडी (अनुदान) दिले जाते:

  • पॉवर टिलर
  • ठिबक व तुषार सिंचन
  • शेततळे
  • पीव्हीसी पाईप्स
  • फळबाग लागवड
  • शेतीसाठी उपयुक्त यंत्रे

शेतकऱ्यांची निवड कशी होते?

अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. निवड झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. त्यानंतर लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात.

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून पूर्वसंमती पत्र दिले जाते. कधी कधी शेतकऱ्यांना मेसेज मिळत नाही. अशावेळी ते स्वतःच MahaDBT पोर्टलवर लॉगिन करून आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासू शकतात.

MahaDBT पोर्टलचे फायदे

  • एकाच अर्जातून अनेक योजनांसाठी अर्ज करता येतो
  • पारदर्शक लॉटरी प्रक्रिया
  • डिजिटल कागदपत्र सादर करण्याची सुविधा
  • वेळ व पैसे वाचवणारी यंत्रणा

महाडीबीटी लॉटरी यादी मोबाईलवर कशी पाहायची?

  1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ ही लिंक उघडा.
  2. त्यानंतर “लॉटरी यादी” आणि “अर्जाची सद्यस्थिती” हे दोन पर्याय दिसतील.
  3. “लॉटरी यादी” या पर्यायावर क्लिक करा.
  4. नंतर हवे ते वर्ष निवडा – उदाहरणार्थ, 2024.
  5. पुढे योजनेचे नाव निवडा – जसे की फळबाग लागवड, ठिबक सिंचन इ.
  6. त्यानंतर महिना, जिल्हा, तालुका हे तपशील भरून “शोधा” या बटणावर क्लिक करा.
  7. आता निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  8. हवी असल्यास यादी डाउनलोड सुद्धा करू शकता.

डाउनलोड लिंक

👉 लॉटरी यादी पाहण्यासाठी अधिकृत लिंक

टीप

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा!

आपला हक्क, आपल्या दारी – डिजिटल शेतकरी पोर्टलची साथ!

Mahesh Bhosale

Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment