---Advertisement---

Crop Insurance: शेतकऱ्यांनो! रब्बी पीक विमा काढण्यापूर्वी ‘हा’ फॉर्म भरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Published On: November 25, 2024
Follow Us
Crop Insurance
---Advertisement---

Crop Insurance: शेतकरी मित्रांनो नमसकार, राज्या मध्ये रब्बी हंगाम हा सुरु झाला आहे, आणि राज्यातील शेतकरी बांधव हे पीक विमा भरतण्यास सुरुवात केली आहे. तर या अर्ज भरताना शेतकरी बांधवांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

रब्बी हंगाम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांची पीक विमासाठी अर्ज करण्याची घाई सुरु आहे. हवामान बदलामुळे पिकांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. तुम्ही शेतकरी असाल आणि रब्बी पीक विमा घेण्याचा विचार करत असाल, तर अर्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.Crop Insurance

महत्त्वाचे कागदपत्रे आणि ‘स्वयंघोषणा फॉर्म’

रब्बी पीक विमासाठी अर्ज करत असताना, काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. पीक पेरणीसाठी स्वयंघोषणा फॉर्म (Self Declaration Form)

तुम्ही पिकाची ऑनलाइन तपासणी करू शकत नसल्यास, तुम्हाला ‘स्वयंघोषणा फॉर्म’ भरावा लागेल. हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सहज आहे, आणि तुम्ही तो आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून भरू शकता.

स्वयंघोषणा फॉर्म काय आहे?

या फॉर्मला ‘पीक पॅरा सर्टिफिकेट’ असंही म्हणतात. रब्बी तसेच खरीप हंगामांमध्ये पीक विमा घेत असताना हा फॉर्म आवश्यक असतो. शेतकऱ्यांना, पेरलेल्या पिकांची माहिती व त्याच्या तपशीलांसह हा फॉर्म सादर करावा लागतो.

फॉर्म कसा भरावा?

स्वयंघोषणा फॉर्म डाउनलोड करा:
तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर फॉर्म डाउनलोड करू शकता.

फॉर्ममध्ये माहिती भरा:

शेतकऱ्याचे नाव, पत्ता, एकूण जमीन, गाव, गट क्रमांक, खाते क्रमांक, पिकाचे नाव, पेरणी केलेली तारीख, क्षेत्र आणि इतर तपशील भरावेत.

स्वाक्षरी आणि मोबाईल नंबर:

फॉर्मच्या शेवटी शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आणि मोबाईल नंबर लिहावा लागतो.

फॉर्म पीक विमा अर्जासोबत जोडावा:

तुम्हाला हा फॉर्म तुमच्या पीक विमा अर्जासोबत जोडावा लागेल.

पीक विमा योजना:

राज्य सरकार पीक विमा योजनासाठी लागणारी रक्कम भरेल. यामध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी मिळेल.
सोलापूर जिल्ह्यात ज्वारी पिकाची नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत केली जाऊ शकते, तर इतर जिल्ह्यांमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, रब्बी, कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती योग्य वाटली असेल तर हि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

Mahesh Bhosale

Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment